आमखेडा येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' व 'पोषण महिना' उत्साहात साजरा
1.1k views | Malegaon, Washim | Sep 29, 2025 वाशिम (दि.२९,सप्टेंबर): मालेगाव तालुक्यात 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' व पोषण महिना अंतर्गत आज अंगणवाडी केंद्र आमखेडा येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमात महिलांना व किशोरवयीन मुलींना पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच मासिक पाळी स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करून योग्य सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून निरोगी कुटुंब घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.