नागपूर शहर: नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; एक अटकेत
शहर पोलीस आयुक्तांच्या"ऑपरेशन थंडर" मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट २ ने अंबाझरी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकली. अंबाझरी बायपास रोडवरील जेनझिस कॅफे'येथे ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत पोलिसांनी **तक्षक युवराज भवरे याला रंगेहाथ पकडले. तो विनापरवाना ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.