नागपूर शहर: किनखेडे लेआउट येथे एका युवकावर हल्ला, थरार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
27 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे यशोधरा हद्दीतील किनखेडे लेआउट येथे एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिवसाढवळ्या काही युवक एका युवकाला मारहाण करत आहे याच्या आधारे पोलीस तपास करीत आहे. या घटनेमुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.