नागपूर शहर: १५ लाख रुपये उकळणाऱ्या खंडणीखोराला अटक, सक्करदरा पोलिसांची कार्यवाही
5 जुलै ला दुपारी 4:30 ला मिळालेल्या माहितीनुसार प्लॉटच्या व्यवहाराच्या नावाखाली फिर्यादीला व्याजाच्या जाळ्यात अडकवून ३ लाखांच्या मोबदल्यात १५ लाख रुपये उकळणाऱ्या कमलेश गणपतराव हनोते याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली. या प्रकरणात अनिता पूरनलाल भारद्वा ही देखील दुसरी आरोपी आहे.सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.