अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं! काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला भाजपचे प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत इशारा देत, "आंदोलन झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल," असे म्हटले. तसेच "इलाका तुम्हारा होगा, लेकिन धक्का हमारा होगा," अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला.
याचवेळी त्यांनी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप हे वरिष्ठ नेत्यांसमोर चमकोगिरी करत आहेत, असा आरोपही केला. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यात राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!
#AmitShah #Pune #BJP #Congress #DheerajGhate #PrashantJagtap #PoliticalNews #BreakingNews #MaharashtraNews #TimesOfMaharashtraNews
Pune City, Pune | Jul 29, 2026