नागपूर शहर: शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी करणार; विद्यार्थ्यांची 'नासा' सहल निश्चित - राज्यमंत्री पंकज भोयर
राज्यातील शिक्षकांवरील कामाचा वाढता ताण, विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाच्या नवनवीन संधी आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राज्यमंत्री (शालेय शिक्षण व गृह) पंकज भोयर यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षक जनगणना, विद्यार्थ्यांची नासा भेट आणि शालार्थ वेतन घोटाळा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर शासनाची भूमिका स्पष्ट केली.