कल्याण: कल्याणचा गोविंदवाडी परिसर जलमय, नागरिकांची घरे आणि म्हशीची तबेले खाडीच्या पाण्याखाली
Kalyan, Thane | Sep 28, 2025 ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत तर अनेक ठिकाणी खाडीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. गोविंदवाडी परिसर देखील जलमय झाला असून खाडीलगतची घरे आणि म्हशीची तबेले पाण्याखाली गेली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तसेच परिसरातले जनजीवन विस्कळीत झाले आहे.