नागपूर शहर: : नागपुरातील १०० वर्ष जुनी जीर्ण इमारत कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, बघा थरारक वायरल व्हिडिओ
नागपूरमधील भंडारा रोडवर मंगळवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. १०० वर्षांहून अधिक काळ जुनी असलेली एक जर्जर इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवाने, ही इमारत बऱ्याच काळापासून रिकामी आणि बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.