नागपूर शहर: ड्रिल मशीनने होल करताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
वर्धा रोडवरील किया कार शोरूमच्या वरती असलेल्या भुमेश पेशने यांच्या नवीन ऑफिसमध्ये ड्रिल मशीनने इलेक्ट्रिक बोर्डला होल करत असताना एका २४ वर्षीय तरुणाला विजेचा तीव्र धक्का लागल्याची दुर्दैवी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, विकास जागेश्वर चव्हाण (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.