नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर'ची मोठी कारवाई: जरीपटका परिसरात ८५ किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या: अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 20 एप्रिल ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत केलेल्या धाडसी कारवाईत जरीपटका परिसरातून ८५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून महागड्या गाड्यांसह सुमारे ४८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे.