महागाव: महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड; तीन आरोपी अटकेत, २ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त
महागाव पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून तब्बल २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.