परभणी महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कालावधीत सर्वच पक्षाच्या राजकीय पुढार्यांसह पदाधिकार्यांनी पडद्याआड सातत्याने साटेलोटे करीत महापालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा आरोप करीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज मंगळवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नीरज हॉटेल येथे एका पत्रकार परिषदेद्वारे केला. या भ्रष्ट साखळीच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांना एक सक्षम पर्याय म्हणून यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी सर्व जागा लढविणार व महापौर आमचाच होणार अशी माहिती दिली.