२०२५ या वर्षाला निरोप देत असतानाच परतवाडा–अंजनगाव सुर्जी मार्गावर घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सावळी दातुरा येथील पेट्रोल पंपसमोर दिनांक ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात हनवतखेडा येथील कौशल घोम या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,परतवाडा ते अंजनगाव सुर्जी मार्गावरून एम एच २७ द्या६८१ आणि एम एच २७ बल२४७ या दोन दुचाकी वेगाने येत असताना या दोन्ही वाहनांची धडक झाली.