दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान पिंपरखेड ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील आरोपी माधव दगडू साखरे, वय 40 वर्षे, रा.पिंपरखेड ता. हदगाव यांने जुन्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी देवानंद पंडीत काळे, वय 25 वर्षे, रा. पिंपरखेड ता. हदगाव यांचे फिर्यादवरुन मनाठा पोलीस स्टेशन मध्ये आरोपी माधव साखरे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों रावले हे करीत आहेत.