लातूर: सीआरपीएफ कॅम्पमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा, वृक्षारोपण आणि जैवविविधता रक्षणावर मार्गदर्शन
Latur, Latur | Oct 9, 2025 लातूर -लातूर वनविभाग, लातूर जिल्हा जैवविविधता समिती व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त लातूर येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संतुलन व जैवविविधता रक्षण यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.