नागपूर शहर: मेड इन पाकिस्तानचे सौंदर्य प्रसाधन मिळत होते नागपुरात ; तहसील ठाण्यात गुन्हा दाखल : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 1 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मेड इन पाकिस्तानचे सौंदर्यप्रसाधन तहसील हद्दीतील एका दुकानात मिळत होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून तहसील पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या सौंदर्यप्रसाधनामुळे मध्ये रसायनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात हानिकारक परिणाम होऊ शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.