कराड: आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने प्रख्यात उद्योगपती बाबा कल्याणी सन्मानित; कराड येथे झाला गौरव सोहळा
Karad, Satara | Sep 17, 2025 कराडचे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले, माजी आमदार स्व. पी. डी. पाटील यांची पुण्यतिथी बुधवारी सकाळी ११ वाजता कराड शहरात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून भारतातील प्रमुख आणि प्रख्यात उद्योगपती व भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कल्याणी यांना प्रदान करण्यात आला. माजी मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील उपस्थित होते.