सुधागड: पाली शहरात अवजड वाहनांना बंदी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी किशन न. जावळे यांनी पाली शहरातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ७ते रात्री ८ या वेळेत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पालीतील नागरिक, भाविक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.