नागपूर शहर: बोरिया पुरा येथे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या मध्यप्रदेश येथील आरोपीला अटक
5 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान बोरिया पुरा येथून शस्त्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव इमरान खान इब्राहिम खान असे असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे आरोपीकडून एक लोखंडी चाकू आणि मोबाईल फोन असा एकूण पंधरा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे