नागपूर शहर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: शेतीचे वाटप पत्र आता थेट मुद्रांक निबंधकांकडे नोंदवता येणार : महसूल मंत्री बावनकुळे
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता शेतीचे वाटप पत्र नोंदवण्यासाठी तहसीलदारांकडे जाण्याची गरज उरलेली नाही.यापूर्वी, शेतीचे वाटप पत्र नोंदवण्यासाठी आधी तहसीलदारांकडे जाऊन त्या पत्राला मान्यता घ्यावी लागत असे. जोपर्यंत तहसीलदार त्याला मान्यता देत नसत, तोपर्यंत त्याचे दस्तऐवज नोंदणीकृत करता येत नव्हते.