नागपूर शहर: : डोहात बुडून लालगंज येथील किशोरवयीन मुलाचा मृत्यू; वर्षभरापूर्वी वडिलांचे छत्र हरपलेल्या कुटुंबावर आघात
डोहात बुडून नागपूरच्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीप रवि छेवले राहणार लालगंज, नागपूर असे मृतकाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेले मित्र थोडक्यात बचावले.मिळालेल्या माहितीनुसार, दीप आपल्या तीन मित्रांसह 25 मे ला दुपारच्या सुमारास नदीवर फिरण्यासाठी गेले. उष्णतेमुळे तिघे जण पाण्यात उतरले.