नागपूर शहर: मतिमंद आणि मूक-बधिर तरुणीवर नराधम पित्यासह एकाकडून अत्याचार; आरोपी गजाआड: हरीश बोराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी 21 एप्रिल दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार मतिमंद आणि मूक-बधिर असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर स्वतःच्या पित्याने आणि एका अन्य व्यक्तीने मिळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी दिली आहे.