लातूर: लातूर–बीडमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा! विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर : पुढील तीन तासांत लातूर आणि बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभाग मुंबई (IMD Mumbai) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि. २ नोव्हेंबर रोजी सायं. ७ वाजता जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार रात्री १० वाजेपर्यंत या भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.