जालना: शिक्षण सभापतीला डावलून शिक्षकांच्या बदल्या केल्या; जालना महापालिकेच्या शिक्षण सभापती सौ. भाग्यश्री जोगस यांचा आरोप
Jalna, Jalna | Jul 12, 2026 जालना महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शिक्षण सभापतींना विश्वासात न घेता काढण्यात आल्याचा गंभीर आरोप शिक्षण सभापती सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस यांनी केला आहे. रविवार दि. 12 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आरोपामुळे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका शिक्षण विभागाने 9 जुलै 2026 रोजी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या रिक्त पदांवरील बदल्यांचे आदेश जारी केले.