सेनगाव: तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात,अनेकांनी बांधलेले गुडघ्याला बाशिंग
सेनगांव तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अनेकांनी गुडघ्याला आत्तापासूनच बाशिंग बांधले आहे. काल सेनगांव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 व पंचायत समितीच्या 20 गणाचे आरक्षण सोडत जाहीर झाले असून अनेकांच्या स्वप्नावर पाणी पडले तर अनेकांचे हौसले बुलंद झाले आहेत. तर आत्तापासूनच भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून ग्रामीण भागामध्ये निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागले आहेत.