पनवेल: फुकट बिर्याणी न दिल्याने विक्रेत्यावर हल्ला; कामोठ्यात धक्कादायक घटना
Panvel, Raigad | Apr 22, 2026 कामोठे परिसरात किरकोळ कारणावरून एका बिर्याणी विक्रेत्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुकट किंवा कमी किमतीत बिर्याणी देण्याची मागणी न मानल्याने दोन युवकांनी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे येथील बिर्याणी विक्रेत्याकडे दोन युवक आले होते. त्यांनी बिर्याणी मोफत देण्याची मागणी केली. विक्रेत्याने नकार दिल्यानंतर दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली.