वाशीम शहर येथील पंचशील नगर येथील एक चिमूरडी आई वडिलांसह शेजारी हळदीच्या कार्यक्रमास गेली असताना विकृत 27 वर्षीय विजय उर्फ भोलाराम बरखम रा पंचशील नगर याने संधीचा फायदा घेत सदर बालिकेचे अपहरण करून स्वतः च्या घरात तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेची माहीती वाशीम शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी जावुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ बालीकेची वैद्यकीय तपासणी करून पिडित बलिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल केली.