हिंगोली: आषाढी एकादशी निमित्त नरसी येथे महा आरोग्य शिबिर पार पडले
नर्सी नामदेव येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली, प्राथमिक आरोग्य केंद्र नरसी नामदेव यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ.नामदेव कोरडे, सपोनी. अशोक घारगे, शैलेश चौधरी, एल.पी.जोगदंड, आर.के. ठाकूर, एस.जी. बेंगाळ आदी उपस्थीत होते. यावेळी अनेक भाविक भक्त महिला पुरुष यांना आरोग्य संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास आरोग्य केंद्राच्या वतीने तपासणी करण्यात आली.