नागपूर शहर: प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीत अवैध धंदे; भाजप युवा मोर्चाचा एनआयटी कार्यालयावर मोर्चा
प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतींमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासाच्या (NIT) सभापतींना घेराव घातला.