नागपूर शहर: जामसावळी हनुमानाच्या नावे देणगी गोळा करणाऱ्या तोतयांना अटक : रितेश आहेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी सहा जुलैला रात्री आठ वाजता दिलेल्या माहितीनुसार,सहा जुलैला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जामसावळी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या नावे नागरिकांकडून बेकायदेशीरपणे देणगी गोळा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी नागपूर आणि कळमेश्वर परिसरातील रहिवासी आहेत.रविवारच्या दिवशी काही लोक जामसावळी हनुमान मंदिराच्या पावती पुस्तकांचा वापर करून घरोघरी जाऊन पैसे गोळा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती