शिवसेना शिंदे गटाच्या किसन नगर जयश्री फाटक आणि सुखदा मोरे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जयश्री फाटक आणि सुखदा मोरे यांनी आज दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास किसन नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला असून माहिती दिली आहे. सोबतच एकता भोईर आणि राम रेपाळे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी उमेदवार न दिल्याने आणि काहींचे अर्ज बाद झाल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.