नागपूर शहर: रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक; अजनी पोलिसांत गुन्हा दाखल
रेल्वे विभागात मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली दोघांची २५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी अनुपम मेश्राम यांची ओळख त्यांचे सहकारी प्रदीप भोयर यांच्याशी झाली होती. प्रदीपने त्याचे रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून मेश्राम यांचा विश्वास संपादन केला.