नागपूर शहर: नागपुरात उड्डाणपुलाच्या कामादरम्यान डीपीला भीषण आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
नागपूर येथील हसनबाग स्मशानभूमी जवळ एक मोठी दुर्घटना टळली आहे. येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यादरम्यान अचानक एका डीपीला भीषण आग लागली. डीपीमधून अचानक आगीच्या ज्वाला आणि धूर निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.