जालना: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली जिल्हा कोषागार कार्यालयाची वार्षिक तपासणी
Jalna, Jalna | Mar 27, 2026 महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 मधील तरतुदीनुसार मार्च 2026 अखेर करण्यात येणाऱ्या वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देऊन तपासणी केली. शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तपासणी दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा कोषागार अधिकारी पंजाबराव पुंडगे, लेखाधिकारी श्री. वनगुजरे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. भिंगारे, श्री. झरेकर व श्री. वीर तसेच मुद्रांक प्रमुख श्याम मारोडे उपस्थित होते.