नागपूर शहर: महिलांना ३३% आरक्षण मिळणे काळाची गरज;मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा मोदी सरकारला पाठिंबा
देशातील महिलांना राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत ३३% आरक्षण मिळावे, ही केवळ महिलांचीच नाही तर सर्वसामान्य स्त्री-पुरुषांचीही अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक निर्णय होत आहे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी महिला आरक्षणाचे जोरदार समर्थन केले. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली मते मांडली.