अवैध दारू गाळण्यासाठी साठवून ठेवलेल्या मोहा सडव्याच्या प्लास्टिक पिशव्या फोडल्याच्या कारणावरून दोन गटात भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नवरगाव फाटा परिसरात घडली. तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दमाहे व त्यांचे पथक पेट्रोलिंगवर असताना, दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांना नवरगाव फाटा येथे दोन गटात हिंसक हाणामारी होताना दिसली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत भांडण थांबवले आणि विचारपूस केली असता, दारूचा सडवा फोडल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.