तिरोडा: गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसकडून "काळी दिवाळी" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले मौन आंदोलन
Tirora, Gondia | Oct 17, 2025 राज्यात अलीकडे आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत ही फसवी व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "काळी दिवाळी" मौन आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.