वाशीमच्या मालेगावमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांच्या पथनाट्य-फ्लॅश मॉबमुळे मतदान जनजागृतीला वेगवाशीमच्या नगरपंचायत मालेगाव येथे जिल्हा स्वीप अभियानांतर्गत एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.