नागपूर शहर: राजेश्वर नगर येथील मोकळ्या मैदानात अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह परिसरात उडाली खळबळ
पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील राजेश्वर नगर परिसरातील मोकळ्या मैदानात झाडी झुडपामध्ये एका तीस वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. झाडी झुडपात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही हत्या आहे की अकस्मात मृत्यू याचा शोध पोलीस घेत आहे याप्रकरणी तूर्तास मानकापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मानकापूर पोलीस पुढील तपास करीत आहे. मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही त्याचेही ओळख पटविणे सुरू आहे