वर्धा: शहिदी समागम चित्ररथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
Wardha, Wardha | Dec 1, 2025 हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा चित्ररथ राज्य शासनाच्यावतीने संपुर्ण विदर्भात फिरविण्यात येत आहे. रथाचे जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी रथाचा शुभारंभ करून रवाना केला.