नागपूर शहर: नागपुरात अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमधील सहभाग वाढल्याने चिंता; विधानसभेत मुद्दा उपस्थित
नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत नागपूर शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहरण, हाणामारी, अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. या गंभीर समस्येवर भाजप आमदार श्री. मोहन गोपाळराव मते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.