घनसावंगी: शेतमजुराचा मुलगा बनला डॉक्टर : सुखापूरीच्या अमोल राखुंडेने जिद्दीच्या जोरावर संपादन केली एमबीबीएस पदवी..
शेतमजुराचा मुलगा बनला डॉक्टर : सुखापूरीच्या अमोल राखुंडेने जिद्दीच्या जोरावर संपादन केली एमबीबीएस पदवी.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सुखापूरी सुखापूरी येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या एका शेतमजुराच्या मुलाने जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. सुखापूरी येथील अमोल राखुंडे याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून नुकतीच एमबीबीएस ही पदवी संपादन केल