फलटण: फलटण शहरानजीक कोळकी येथे रात्री एका गॅरेजला भीषण आग; अनेक गाड्या जळून खाक
Phaltan, Satara | Oct 17, 2025 फलटण शहरानजिकच्या कोळकी रस्त्यावर कार केअर ऑटो गॅरेजमध्ये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता भीषण आग लागली. या आगीमध्ये २० हुन अधिक महागड्या कार जळून खाक झाल्या. आग लागण्यामागील निश्चित कारण समजू शकले नाही. फलटण तालुक्यातील हे एक नामांकित कार गॅरेज असून या गॅरेजमध्ये महागड्या कार दुरुस्तीसाठी येत असतात. फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा एक बंब तसेच पाण्याचे तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले.