चित्रलेखा पाटील म्हणाल्या की केंद्र आणि राज्य शासनाने व्हिडीओची सखोल चौकशी तसेच सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे, व्हिडीओ खरी खोटी याची त्यांनी चौकशी करावी. त्यांनी महेंद्र दळवींची पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितले की “सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत. मागच्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यांनी ‘५० खोके’ म्हटलं तर कॅशबोम्ब वाल्यांची बायको माझ्यावर धावत आल्या.