नागपूर शहर: नागपूर मनपाचा अतिक्रमणविरोधी धडाका; धरमपेठ, गांधीबाग व धंतोली झोनमध्ये कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाने आज शहराच्या विविध भागांत संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. सीताबर्डी मेन रोड, व्हेरायटी चौक परिसरात रस्त्यावरील अवैध ठेले व दुकाने हटवून कपड्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. महाल चौक, बडकस चौक, गडकरीवाडा, शिवाजी पुतळा, केळीबाग रोड व अयाचित मंदिर परिसरात कारवाई करण्यात आली.