गुंज येथील विठ्ठल मोतीराम तुपकर (वय ३०) या शेतकरीपुत्राने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, दि. १ नोव्हेंबररोजी सकाळी उघडकीस आली. क्रूझर गाडी खरेदीत फसवणूक झाल्याने व फायनान्स कंपनीने मानसिक व आर्थिक छळ केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.