नागपूर शहर: एअर होस्टेसची गळफास लावून आत्महत्या; प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
कपड्यांवरून होणारे वाद आणि लग्नास नकार दिल्याने २८ वर्षीय एअर होस्टेस गायत्री बनसोड हिने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. गायत्री एअर होस्टेस असल्याने कामासाठी शॉर्ट कपडे घालत असे, ज्याला तिचा प्रियकर रितेश वांदीले याचा विरोध होता. तो या कारणावरून तिला सतत मानसिक त्रास द्यायचा. आरोपीने गायत्रीच्या पालकांबाबतही अपमानास्पद शब्द वापरले होते आणि लग्नास नकार दिला होता.