अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पार्किंग कंत्राटाच्या नावाखाली नाशिक येथील दिग्विजय इंटरप्रायझेस या कंपनीकडून शहरात बेकायदेशीर टोईंग, मनमानी दंड वसुली आणि नागरिकांना धमकावणे अशा प्रकारे गंभीर गैरप्रकार सुरू आहेत. कंपनीकडून शहरात कायदेशीर अधिकार नसताना वाहने उचलून ₹800 ते ₹1000 दंड आकारला जातो. ही वसुली कायद्याविरुद्ध असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत आहे. असा आरोप नगरसेवक नज्जू पैलवान यांनी केला आहे मेट्रो न्यूजला त्यांनी मुलाखत दिली आहे.