सेनगाव: बाभुळगांव जिल्हा परिषद गटातून सामाजिक कार्यकर्त्या संगीता वैरागड निवडणूक लढणार, निवडणूक होणार अटीतटीची
येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आत्तापासूनच मोर्चे बांधणी करायला सुरुवात करत आहेत. तर बाभुळगांव जिल्हा परिषद गटामधून सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता प्रमोद वैरागड यांचे नाव आघाडीवर आहे. बाभुळगांव जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या सर्कल मधून ताकतोडा येथील पोलीस पाटील प्रमोद वैरागड यांच्या पत्नी सौ संगीता प्रमोद वैरागड यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला.