Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पनवेल: नवी मुंबई एअरपोर्टची अबुधाबीसाठी १५ जुलैला पहिली झैप

Panvel, Raigad | Jun 23, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून नवा टप्पा गाठला जाणार असून, येत्या १५ जुलै रोजी पहाटे अबुधाबीकडे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण रवाना होणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या नॉनस्टॉप सेवेद्वारे प्रत्यक्ष शुभारंभ होणार असून, या उड्डाणासाठी तिकीट विक्रीलाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विमान वाहतुकीला नवे दालन उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २५ डिसेंबरपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले होते, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा प्रारंभ होत असल्याने नवी मुंबई विमानतळाची कार्यक्षमता आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे.